
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची अपडेट
५०८ किमी लांबीचा पल्ला ट्रेन फक्त २ तासात गाठता येणार
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली बुलेट ट्रेनची माहिती
Bullet Train News : मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. काल (३ ऑगस्ट) रेल्वेमंत्र्यांनी गुजरातमधील रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी ५०८ किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरवरील बांधकामाबाबत महत्त्वाची घोषणा केली. बुलेट ट्रेन लवकरच सुरु होणार आहे. ही ट्रेन ताशी जास्तीत जास्त ३२० किमी वेगाने धावेल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
रविवारी रेल्वेमंत्र्यांनी भावनगर-अयोध्या एक्स्प्रेस, रेवा-पुणे एक्स्प्रेस आणि जबलपूर-रायपूर एक्स्प्रेस या ३ नव्या एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवला. त्यावेळेस त्यांनी बुलेट ट्रेनची माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रवास २ तास ७ मिनिटांमध्ये पूर्ण होईल. एमएएचसीआर प्रकल्प जपानच्या सहकार्याने विकसित केला जात आहे. त्याला जीआयसीएकडून मिळालेला निधी दिला जात आहे. एकूण १,०८,००० कोटींच्या अंदाजे खर्चांपैकी, जीआयसीए तब्बल ८८,००० कोटींचे आर्थिक सहकार्य करत आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रकल्पामध्ये एकूण १२ स्थानकांचा समावेश असेल. यात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश असणार आहे. ही लाईन मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसीपासून सुरु होईल आणि अहदाबादमधील साबरमती येथे संपेल.
बुलेट ट्रेन कॉरिडॉर पूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी गुजरातमधील विभागात चाचणी सुरु होणे अपेक्षित आहे. नव्या एक्स्प्रेस ट्रेन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवताना रेल्वेमंत्र्यांनी अनेक नव्या प्रकल्पांची रुपरेषा मांडली. लवकरच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु होईल असा विश्वास देखील रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दर्शवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.