Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यभरात थंडीने भरली हुडहुडी; नाशिकमध्ये सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद

Weather Update Temperature: थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी शेकोटीचा देखील आधार घ्यावा लागत आहे. यापुढे देखील आणखी काही दिवस थंडीचा जोर अशाच प्रकारे कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Weather Update:

राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांत तापमानात मोठ्याप्रमणावर घट झालीये. गेल्या काही दिवसांपासून धुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत असून, आज देखील ६.८° अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून १०° पेक्षा देखील कमी तापमानाची नोंद धुळ्यात केली जात आहे. आज देखील धुळ्याचे तापमान हे ६.८° सेल्सिअस असल्यामुळे धुळेकरांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे.

घराबाहेर मॉर्निंग वॉकसाठी पडणाऱ्या नागरिकांना गरम व उबदार कपड्यांचा आधार घेऊनच घराबाहेर पडावं लागत आहे. त्याचबरोबर नागरिकांना थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी शेकोटीचा देखील आधार घ्यावा लागत आहे. यापुढे देखील आणखी काही दिवस थंडीचा जोर अशाच प्रकारे कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

नाशिक आणि निफाडकरांना देखील हुडहुडी भरली आहे. नाशिकमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झालीये. नाशिक आणि निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद आज करण्यात आली. निफाडमध्ये किमान ४.४° इतक्या नीच्चांकी तापमानाची नोंद तर नाशिकचा पारा ८.६° अंशावर घसरला आहे. कडाक्याच्या थंडीने निफाड, नाशिककर गारठले आहेत.

नागपूरात देखील काडाक्याची थंडी आहे. नागपूरात आज ८.७° तापमानाची नोंद करण्यात आलीये. २४ तारखेला १४.६° तापमान नोंदवले असताना आज अचानक तापमानाचा पारा खाली घसरला आहे. आज ५.९° तापमानाचा पार घसरालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT