Weather Update News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

IMD weather forecast : महाराष्ट्रात पारा घसरला असून पुढील काही दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि विदर्भात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

Namdeo Kumbhar

  • पावसानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली.

  • राज्यात तापमान झपाट्याने घट होत आहे.

  • नाशिक, पुणे, मुंबईसह विदर्भातील शहरांमध्ये पारा सरासरीपेक्षा खाली आला आहे.

  • पुढील ५ ते ६ दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज आहे.

IMD predicts severe winter in Maharashtra : पावसाने उघडीप घेतल्यानंतर राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागातील पारा हळूहळू घसरताना दिसत आहे. नाशिक, मुंबई, पुण्यासह विदर्भातील अनेक शहरातील तापमान सरासरीपेक्षा कमी झालेले आहे. पुढील पाच ते सहा दिवसात राज्यात थंडी पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा हाडे गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे. मागील २५ वर्षातील ही सर्वाधिक थंडी असेल, असेही काही जणांकडून सांगण्यात येत आहे.

हवमान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील तापमानात हळूहळू घट होत आहे. पुढील काही दिवसांत दिवसांत हे प्रमाण आणखी वाढू शकते. पावसाने काढता पाय घेतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. हळूहळू राज्यात थंडीचं आगामन होणार आहे. मागच्या 25 वर्षांपेक्षा यावेळी थंडी जरा जास्त असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत आज धुक्याची चादर पसरली आहे. त्याशिवाय नाशिक, महाबळेश्वर, सांगली-साताऱ्यात अनेक ठिकाणी धुके पडलेय. निफाडमध्ये पारा प्रचंड घसरलाय.

५ दिवसात राज्यात कडाक्याची थंडी पडणार -

गेल्या काही दिवसात राज्यातील विविध शहराच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. पुढील पाच ते सहा दिवसात राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशाने घट होण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. म्हणजे, पुढील आठवड्यापासून राज्यत थंडी जाणवण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात कडाक्याची थंडी पडू शकते, अशा अंदाज वर्तवला आहे. ला निनाच्या प्रभावामुळे यंदा थंडीचा लाट येऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.

विदर्भाचा पारा घसरला, गुलाबी थंडी येणार -

विदर्भाच्या तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. यामुळे थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. मात्र, राज्याच्या काही भागात अद्याप पावसाचे सावट आहे. पुढील दोन दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिणमध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरात आज धुके पसरले असून अंशतः ढगाळ हवामान राहू शकते, असे आयएमडीकडून सांगण्यात आलेय. मुंबईचे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश इतके असेल. कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: या स्पर्धकाला बिग बॉसने दिली सुपर पॉवर; आता घरातील सदस्यांना करणार नॉमिनेट

Maharashtra Politics: महाराष्ट्रात नवं राजकीय समिकरण, याठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र येणार? 'त्या' भेटीमुळे चर्चांना उधाण

Prostate Cancer Risk: सब्जाचं जास्त सेवन आरोग्यासाठी धोक्याचं; अ‍ॅलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंत वाढतो धोका

Gold Rate Today : पुन्हा सोन्याचे दर घसरले, अचानक इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा ढोबळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT