राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच हवामान खात्याने १६ मे म्हणजे उद्या देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडण्याचा इशारा दिला आहे. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी उद्या घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने (Weather Department) केले आहे.
मुंबई हवामान खात्याने उद्याच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरूवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना आणि लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तर नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये घराबाहेर पडताना नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
नागपूर वेध शाळेचे शास्त्रज्ञ एम एल शाहू यांनी सांगितले की, 'बंगालच्या सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. याच ढगाळ वातावरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात तापमान नोंदवले गेले नाही. मे महिन्यात साधारण ४५ अंशाचा घरात तपमान असण्याचा अंदाज असतो. मात्र यंदा ते तापमान नोंदवले गेले नाही. बंगालच्या सागरामध्ये मान्सून सदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. मात्र याचा परिणाम किंवा विदर्भात दाखल कधी होईल याचा अंदाज आताच व्यक्त करता येणार नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.