Mumbai News: मुंबईकरांचं मरण, होर्डिंगवरून राजकारण; भुजबळ ठाकरेंच्या पाठीशी, भाजप पडले तोंडघशी

Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईत माणसाचं आयुष्य कवडीमोल आहे. हेच घाटकोपर दुर्घटनेनं दाखवलं आहे. हा गॅरंटीचा जमाना असला तरी मुंबईत कुठे, कसा, कुणाचा जीव जाईल हे कुणीच सांगू शकत नाही. कारण इथले राजकारणी आणि अधिकारी निब्बर झाले आहेत.
Politics On Ghatkopar Hoarding Collapse
Politics On Ghatkopar Hoarding CollapseSaam Tv

Ghatkopar Hoarding Collapse: 

>> विनोद पाटील

मुंबईत माणसाचं आयुष्य कवडीमोल आहे. हेच घाटकोपर दुर्घटनेनं दाखवलं आहे. हा गॅरंटीचा जमाना असला तरी मुंबईत कुठे, कसा, कुणाचा जीव जाईल हे कुणीच सांगू शकत नाही. कारण इथले राजकारणी आणि अधिकारी निब्बर झाले आहेत. घाटकोपरच्या या अनधिकृत होर्डिंगनं यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय. निरपराध जीवानं गेले. जखमी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावर राजकारण झाले नसते तर नवलच.

ज्या भावेश भिंडेंनं हे अनधिकृत होर्डिंग लावलं होतं, त्याचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो भाजप आमदार राम कदम यांनी ट्वीट केला आणि आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत आघाडी घेतली. यावर मौन बाळगतील ते उद्धव ठाकरेंचे शिलेदार कसले. लगेचचं अनिल परबांनी भिंडेचे ठाकरेंशी संबंध सिद्ध करण्याचं आव्हान दिलं.

Politics On Ghatkopar Hoarding Collapse
Special Story: गॅस भरायला पंपावर गेले आणि एका क्षणात सगळं संपलं! घाटकोपर दुर्घटनेनं नालासोपाऱ्याचं कुटुंब पोरकं केलं

या फोटोवरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला असता एकेकाळी मुंबईकर शिवसैनिक असलेले आणि आता महायुतीत ज्येष्ठ मंत्री असलेले छगन भुजबळ ठाकरेंच्या मदतीला धावून आले आहेत. एवढंच नव्हे तर महापालिकेवर प्रशासनक असल्यानं आमचीच सत्ता असल्यामुळे ठाकरेंचा काय संबंध असा तिखट सवाल करत भाजपला घरचा आहेर दिलाय.

ज्याच्या नराधमाच्या निष्काळजीपणामुळे एवढ्या मुंबईकरांचे बळी गेले तो भावेश भिंडे कोण आहे, हे जाणून घेऊ....

भावेश भिंडे हा नववी फेल भावेश भिंडे इगो मीडिया प्रा. लिमिटेडचा संचालक आहे. लहानपणापासून बिझनेस क्षेत्रात नाव कमावण्याची त्याची इच्छा होती. त्याच्या कंपनीची टॅगलाईन Noting is Impossible आहे. तो स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अॅड एजन्सीत ऑफिस बॉयचं काम करायचा. भावेश भिंडेवर यापूर्वी 21 गुन्हे दाखल आहेत.

Politics On Ghatkopar Hoarding Collapse
Lok Sabha Election: भाजपला बहुमताचा आकडा गाठणं कठीण, अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

या भावेश भिंडेंनं घाटकोपरमध्ये मुंबईतलं सर्वात मोठं होर्डिंग उभं केलं. मात्र हे अनधिकृत होर्डिंग ना कोणत्या अधिकाऱ्याला दिसलं ना कोणत्या राजकारण्याला...आता ऐन मुंबईच्या मतदानापूर्वी ही दुर्घटना घडल्यामुळे यावरून आरोप-प्रत्यारोपांना आणखीच धार येणार....आणि सर्वच आपापली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणार. मात्र या प्रकरणात भुजबळांनी ठाकरेंची पाठराखण केल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार एवढं नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com