Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Maharashtra Weather Update: राज्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. त्यामुळे दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला. राज्यात आज २३ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

Priya More
  • महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

  • राज्यातील २३ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

  • महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट

  • विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा जोर धरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उकाडा देखील वाढला आहे. उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये राज्यात वादळी वाऱ्यासह पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आज राज्यभर सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकामी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा घाटमाथा, सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढू शकतो. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आहे. दुष्काळामुळे हैराण झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

पोलीस स्टेशमध्ये आदित्य,अमितचा 'ठाकरेबाणा', जीपच्या टपावर उभं राहत सरकारला दिला इशारा| Photos

SCROLL FOR NEXT