Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून दाखल; ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा पश्चिम किनारपट्टीला फटका बसण्याची शक्यता

पुरेसे पोषक वातारण नसल्याने राज्यात १६ जूनपर्यंत पावसाच्या सरी दाखल होतील. तसेच २२ जूनपर्यंत संपूर्ण राज्यभर मान्सून दाखल होत आहे.

Ruchika Jadhav

Weather Update: राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे पावसाच्या सरींकडे साऱ्यांचे डोळे लागले आहेत. अनुकूल वातावरण नसल्यामुळे मोसमी वारे थांबले आहेत. बिपरजॉय चक्रीवादळावर मोसमी वाऱ्यांचा वेग अवलंबून आहे. अशात पुरेसे पोषक वातावरण नसल्याने राज्यात १६ जूनपर्यंत पावसाच्या सरी दाखल होतील. तसेच २२ जूनपर्यंत संपूर्ण राज्यभर मान्सून दाखल होत आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. (Latets marathi News)

अनुकूल वातावरण नसल्याने राज्यात पाऊस लांबणीवर पडला आहे. मोसमी वारे संथ गतीने वाहत आहेत त्यामुळे अद्याप मुसळधार पाऊस बरसलेला नाही. केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी सात केंद्रांच्या कार्यक्षेत्रात तुरळक पाऊस सुरू आहे. काही क्षेत्रांत ढग दाटून येत आहेत. केरळमध्ये मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरणास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या २ दिवसांत केरळमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे.

पोषक वातावरण निर्माण होत असल्याने लवकरच केरळमध्ये मोसमी वाऱ्यांचे आगमन होईल, असं हवामान शास्त्रज्ञ डॉ.अनुपम कश्यप यांनी सांगितलं आहे. राज्यात देखील पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. अनेक शहरांमध्ये सकाळी ढग दाटून आल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्याची हवामानाची स्थिती पाहता दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या २४ तासांत बिपोरजॉय चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. कोकण किनारपट्टीच्या दिशेने बिपरजॉय चक्रीवादळ आल्यास संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर वादळवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाचा प्रभाव कुठे दिसेल?

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार वादळामुळे येत्या 24 तासांमध्ये कोकण किनारपट्टी भाग, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील बहुतांश भागांत पावसाच्या सरी बरसतील. मुंबई, ठाणे, पालघरमध्येही सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT