Maharashtra Weather Update: राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पडणार मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

Weather Department: राज्यात पुढचे दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याचा इशारा देण्यात आला.
Weather Update
Weather UpdateSaam Tv
Published On

IMD Alert: उकाड्यामुळे हैराण झालेली जनता सध्या मान्सूनच्या (Monsoon 2023) प्रतीक्षेत आहे. अशामध्ये मान्सूनचा प्रवास लांबला आहे. मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावासाने (Unseasonal Rain) झोडपून काढले आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आहे. अशामध्ये मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच राज्यात पावसाचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. राज्यात पुढचे दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Weather Update
IMD Alert: अरबी समुद्रात तयार होणार नवं चक्रीवादळ; मुंबई, ठाण्यासह कोकणात पडणार पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये 5 जून म्हणजे आज विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करत सांगितले की, 'राज्यात पुढील 2, 3 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.4, 5 दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.'

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, 5 जून रोजी म्हणजे आज ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, जालना, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 6 जून रोजीही बहुतांश जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण या पावसानंतर काही भागांमध्ये उष्णतेची लाट पसण्याची शक्यता आहे.'

Weather Update
Chicken And Fish Price Hike: नॉनव्हेज लव्हर्सला झटका! मासे आणि चिकनच्या दरात वाढ, जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार

दरम्यान, मान्सूनचा प्रवास लांबला आहे. मान्सून तीन ते चार दिवस उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये 4 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो. मान्सून केरळमध्ये रविवारी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण तो अंदाज चूकला कारण मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झाला नाही. मान्सून केरळमध्ये तीन ते चार दिवस उशिराने दाखल होणार असल्यामुळे तो महाराष्ट्रात देखील उशिराने दाखल होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com