Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: पुणे, सातारा पावसाच्या रडारवर; अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

Mumbai Pune Weather Forecast For August 8: पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : राज्यात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. श्रावण महिना सुरू झालाय. पावसाचा जोर कमी झाला असून शेतीच्या कामांना वेग आलाय. खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतु पुण्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यात तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीडसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केलाय.तर घाट माथ्यात तीव्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही भागात ३० ते ४० किमी/ताशी वेगाने वारे वाहणाऱ्या संभाव्य वादळाचा इशारा देण्यात (Maharashtra Weather Update) आलाय.

रेड अलर्ट जारी

सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाट माथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पुण्यात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असून त्यामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. राज्यात उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात (Pune Weather Forecast) आलीय.

विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशात यावर्षी सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता (Rainfall Alert) आहे. विशेषतः राज्याच नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्याची 'अल निनो' स्थिती त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात तटस्थ राहण्याची अपेक्षा हवामान विभागाने वर्तवली आहे. ऑगस्टमध्ये 'ला निना'च्या स्थितीत बदल होण्याची शक्यता (Heavy Rain) असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

SCROLL FOR NEXT