Maharashtra Winter Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather: दिवाळीत हुडहुडी भरणार, राज्यात 'या' तारखेला थंडीची लाट पसरणार

Maharashtra Winter Update: उकाड्यामुळे हैरण झालेले सर्वजण थंडी कधी पडणार याची वाट पाहत आहेत. राज्यात थंडी कधी पडणार याबाबत हवामान खात्याने महत्वाची माहिती दिली आहे.

Priya More

Maharashtra Winter Update: राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसा कडाक्याचे ऊन आणि रात्री मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या ऑक्टोबर हिटमुळे राज्यातील जनतेचे चांगलेच हाल होत आहे. तर दुसरीकडे राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण दसरा पावसामध्येच गेला. दिवाळी सण जवळ आला तरी देखील राज्यात पाऊस सुरूच आहे. अशामध्ये सर्वजण थंडी कधी पडणार याची वाट पाहत आहेत. राज्यात थंडी कधी पडणार याबाबत हवामान खात्याने महत्वाची माहिती दिली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरणार आहे. म्हणजेच दिवाळीपासून राज्यात थंडी सुरू होणार आहे. सध्या सुरू असलेला पाऊस देखील विश्रांती घेणार आहे. ऑक्टोबर अखेरला मान्सूनची सांगता होणार आहे. येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या भागात थंडीला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज वर्तवला आहे.

गुरुवारपासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता आहे. ४ दिवसांत दक्षिण नगर , पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Group 1st List: CM शिंदेंविरोधात दिघेंना उमेदवारी, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

Diwali Picnic Spot : दिवाळीत 'या' ठिकाणी लाँग ट्रीप प्लान करा, जोडीदार होईल खूश

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Election : CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने निष्ठावंत उतरवला; आतापर्यंत कोणाला मिळाले एबी फॉर्म ? वाचा

Mahayuti News : अजित पवारांसह फडणवीस दिल्लीकडे रवाना; काय आहे कारण, पाहा Video

SCROLL FOR NEXT