Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

Saam Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी थेट लढत होत आहे. सकाळच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कॉंग्रेसचे रमेश बागवे यांना संभाव्य आमदार म्हणून पसंती मिळत आहे.
Pune Cantonment
Pune CantonmentSaamTv
Published On

पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी थेट लढत होत आहे. मात्र या ठिकाणी कॉंग्रेसच वर्चस्व आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराला येथे फारशी पसंती मिळताना दिसलेली नाही. सकाळच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कॉंग्रेसचे रमेश बागवे यांना संभाव्य आमदार म्हणून पसंती मिळत आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे सुनील कांबळे हे निवडणूक लढवत आहेत.

पुणे शहरात ज्या काही चुरशीच्या विधानसभा आहेत त्यात पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघाचा समावेश आहे. भाजपचे सुनील कांबळे हे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत. तर कॉंग्रेसचे रमेश बागवे हे माजी मंत्री आहेत. 2019 पूर्वी या ठिकाणी रमेश बागवे यांचा प्रभाव होता. मात्र 2019 ला भाजपने या मतदारसंघावर सत्ता मिळवली.

Pune Cantonment
Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

यंदाच्या निवडणुकीत या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात झालेल्या काही कारवायांमुळे भाजपला येथे फटका बसण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसच संघटन या ठिकाणी मोठं असल्याने रमेश बागवे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मतदारसंघात सर्वधर्मीय लोक आहेत. याचा फायदा दोन्ही उमेदवारांना होणार असला तरी कॉंग्रेसने या निवडणुकीत अंतर्गत गटबाजी रोखण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे रमेश बागवे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे.

Pune Cantonment
Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com