Maharashtra Temperature Update  
महाराष्ट्र

Temperature: एप्रिल महिन्यातील अखेरचा आठवडा ठरेल 'तापदायक'; मे महिन्यातही सूर्य ओकणार आग

Maharashtra Temperature: यावर्षी बहुतेक वेळा तापमान 40 अंश डिग्री सेल्सिअस राहिलंय. तर विदर्भात पुढील चार ते पाच दिवस उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलाय. पुढील काही दिवस तापमान वाढलेले राहणार असणार आहे.

Bharat Jadhav

राज्यात एप्रिल शेवटचा आठवडा आणि मे महिन्यात तापमान वाढतच राहणार आहे. मे महिन्यात तापमानाचा पारा ४० अंश डिग्री सेल्सिअसच्या जवळ राहणार आहे. तर विदर्भात पुढील चार ते पाच दिवस उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय. आज तापमानाने पुन्हा नवा उच्चांक गाठत या हंगामातील सर्वाधिक म्हणजे ४५.८ अंशाचा पारा गाठला. राज्यात हे सर्वाधिक तापमान आहे.

चंद्रपूरमध्ये काल राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. पुढील काही दिवस चंद्रपूरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात ही तापमान पुढील काही दिवस तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत असणार आहे. आजपासून पुढील तीन दिवसांसाठी नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.

उत्तर व पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत असल्याने विदर्भात उष्णतेची लाट आहे. वातावरण शुष्क (ड्राय) असल्याने उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. सोमवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सिअस ने अधिक आहे. त्यामुळेचं आजपासून पुढील ३ दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात हिट- वेव्ह चा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी प्रामुख्याने चंद्रपूर,अमरावती,नागपूर आणि अकोल्यात तापमानाचा पारा आणखीचं वाढण्याची शक्यता आहे. तर बुधवारी यामध्ये वर्धा जिल्हाची भर पडणार आहे. ही परिस्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहे. ज्याप्रमाणे दिवसा सामान्यपेक्षा अधिक नोंदवण्यात येत आहे..त्याचं प्रमाणे रात्रीच्या तापमानात ही वाढ झाली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरकर नागरिकांनी दुपारी १२ ते ४ वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. एप्रिल २००९ साली विदर्भात ४७ डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. यंदाचे तापमान सुध्दा त्याचं दिशेने वाटचाल तर करत नाही ना अशी परिस्थिती दिसून येत आहे.. महत्वाचे मार्च महिन्यात तब्बल २१ दिवस तापमान सामान्यपेक्षा अधिक नोंदवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT