Maharashtra Weather Forecast Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : उन्हाळ्याची चाहूल लागली! महाराष्ट्र तापायला सुरूवात, किमान अन् कमाल तापमानात वाढ; आज कसं हवामान?

Maharashtra Weather Forecast: राज्यात थंडी कमी झाली असून आता तापमानात वाढ होऊ लागली आहे. राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Priya More

राज्यातून थंडी गायब होऊन आता तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात सगळीकडेच उन्हाचे चटके जाणवत असून उन्हाळ्याची चाहूल लागली. राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान ३५ अंशाच्या वर गेले आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमान वाढले असून पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सोमवारी राज्यात कमाल तापमानात वाढ दिसून आली. सकाळपर्यंतच्या २४ ताांमध्ये ब्रम्हपूरीसह जेऊर आणि अकोला येथील तापमान ३५ अंशांपार गेले. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी ३४ ते ३५ अंशांच्या दरम्यान तापमान होते. उकाडा वाढल्यामुळे आणि उन्हाच्या झळा लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येत्या काही दिवसांत राज्यातील किमान आणि कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

पुणे शहरात यंदा थंडी जाणवलीच नाही. त्यामुळे फेब्रुवारीतच शहर उन्हाच्या झळांनी तापले आहे. गेल्या ४८ तासांत शहराचे तापमान सरासरी ३५ ते ३७ अंशांवर गेल्याने पुणे देशातील सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत गेले आहे. यंदा देशातील तापलेल्या शहरांत पुणे शहराचे नाव सर्वांत पुढे आहे. राज्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच पारा ३५ ते ३७ अंशांवर गेला आहे. यात पुणे जिल्ह्यासह शहरातील सर्वंच भागांचे तापमान राज्यात सर्वात जास्त आहे.

पुणे शहरातील कोरेगाव पार्क, सोलापूर, वाशिम आणि वर्धा या शहरांत सर्वाधिक तापमानाची स्पर्धा आहे. यात सलग दोन दिवस पुणे शहरातील कोरेगाव पार्क तापमानाच्या बाबतीत आघाडीवर होते. याठिकाणी शुक्रवारी हंगामातील सर्वोच्च ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर शनिवारी आणि रविवारी ३६ अंशांवर पारा गेला होता.

गेले ४८ तासांत शहरातील सरासरी तापमान पाहिले असता सोलापूर, वर्धा, अकोला,अमरावती, बुलडाणा आणि पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील कमाल तापमान राज्यात सर्वाधिक असल्याचे दिसून आले. यातही कोरेगावचे तापमान शुक्रवारी राज्यात सर्वाधिक ३७ अंशांवर गेले होते. पुणे शहराचा सरासरी पारा ३५ ते ३६ अंशांवर देशात सर्वात वेगाने गेला आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते प्रदूषणामुळे शहरात कमालीचा उकाडा जाणवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saptashrungi Gad : सप्तशृंगी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत गडावर खासगी वाहतूक बंद

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Rinku Rajguru: 'आवडतं तेच काम करं, आनंद नसेल तर...'; रिंकू राजगुरुला आई-वडिलांता मोलाचा सल्ला

Pune Water Cut : पुण्यात पाणीकपातीचं संकट! कोणत्या दिवशी कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

Mrunmayee Deshpande : मनवा अन् श्लोकची जबरदस्त केमिस्ट्री; मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक' चित्रपटाचे पहिलं गाणं रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT