Maharashtra Weather Update  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain News: कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता! 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; कसं असेल आजचे हवामान? वाचा सविस्तर

Maharashtra Rain News Weather IMD Alert Update: आजही कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Weather Update: गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून विदर्भात पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

 विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या धुवांधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेकांच्या शेतातील हाता तोंडाशी आलेला भात पीक आणि इतर पिके जमीनदोस्त झाली आहेत. हवामान विभागाने आजही विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आज (ता. ११) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पूर्व विदर्भातील अमरावती, नागपूर जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उद्यापासून (ता. १२) राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT