Maharashtra Politics : विदर्भात मविआला 45, कोकणात महायुतीला 30; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काय? नव्या सर्व्हेत कुणाला किती जागा? VIDEO

Maharashtra Political News : आगामी विधानसभेच्या नव्या सर्व्हेने महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. या सर्व्हेत महाविकास आघाडी विदर्भात सरस आहे. तर कोकणात महायुतीची बाजी पाहायला मिळत आहे.
 विदर्भात मविआ सरस, कोकणात महायुतीची बाजी; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काय? नव्या सर्व्हेत कुणाला किती जागा?
Maharashtra Politics Saam tv
Published On

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात पार पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचदरम्यान, लोकपोलचा सर्व्हेने राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीला राज्यात किती जागा मिळतील, या आकडेवारीचा अंदाज लोकपोल सर्व्हेतून समोर आला आहे.

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लोक पोल' सर्व्हेत महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला १४१-१५४ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इतर राजकीय पक्षांच्या झोळीत पाचहून १८ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महायुतीला ३८-४१ टक्के, महाविकास आघाडीला ४१-४४ टक्के आणि इतर पक्षांना १५-१८ टक्के मतदान मिळू शकतं.

लोकपोलचा सर्व्हे, महायुतीला धक्का?

महायुती

115 ते 128

मविआ

141ते 154

इतर

5 ते 18

Maharashtra politics
lok poll Saam tv

महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी विधानसभेत १४५ ची मॅजिक फिगर मिळवावी लागते. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आहे. तर महाविकास आघाडीतील पक्ष विरोधात बसले आहेत.

लोकपोलचा सर्व्हे, महायुतीला धक्का?

लोकपोलच्या सर्व्हेत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी विदर्भात सरस दिसत आहे. तर महायुती कोकणात बाजी मारताना दिसत आहेत. विदर्भात ६२ जागांपैकी महायुतीला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला ४० ते ४५ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

lok poll survey
vidarbhaSaam tv

तर उत्तर महाराष्ट्रातील ४७ जागांपैकी महायुतीला २० ते २५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला २० ते २५ या सारख्याच जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

lok poll survey
north maharashtra Saam tv

ठाणे-कोकणातील ३९ जागांपैकी २५ ते ३० जागा महायुतीला दाखवण्यात आल्या आहेत. तर ५ ते १० जागा महाविकास आघाडीला दाखवण्यात आल्या आहेत.

lok poll
thane konkan Saam tv

मुंबईतील ३६ जागांपैकी १० ते १५ जागा महायुतीला दाखवण्यात आल्या आहेत. तर महाविकास आघाडीला २० ते २५ जागा दाखवण्यात आल्या आहेत.

survey
mumbaisaam tv

पश्चिम महाराष्ट्रातील ५८ जागांपैकी २० ते २५ जागा महायुतीला मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

lok poll
western Maharashtra Saam tv

मराठवाड्यात महाविकास आघाडी जड पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील ४६ जागांपैकी १५ ते २० जागा महायुतीला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर २५ ते ३० जागा महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

marathwada lok poll
marathwada Saam tv

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com