Maharashtra Rain : विदर्भात धडकी भरवणारा पाऊस, रस्त्यांवर अक्षरश: कमरेइतकं पाणी, पाहा VIDEO

Vidarbha Rain News : गणरायाचे आगमन होताच विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

गणरायाचे आगमन होताच विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. गडचिरोलीत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही भामरागड मधील पूरस्थिती कायम असून येथील जवळपास 50 हून अधिक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येथील बाजारपेठ पूर्णतः पाण्याखाली असून अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे. परिणामी साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठी नासधूस झाली आहे. तर दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातही पूरस्थिती उद्भवली असून करजेली गावातील 28 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

सोमनपल्ली गावात गोदावरी नदीचे बॅक वॉटर शिरल्याने येथील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत पुरामुळे जिल्ह्यातील आल्लापल्ली-भामरागड, आल्लापल्ली-सिरोंचा, मुलचेरा-आष्टी, कोरची-बोटेकसा हे प्रमुख मार्ग बंद आहेत.

गोंदियात मुसळधार पाऊस

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदियात मध्यरात्री पासून दमदार हजेरी लावली आहे. तर सूर्याटोला भागात असलेला बांध तलाव ओव्हर फ्लो झाल्याने अनेक घरात पाऊसाचे पाणी शिरले आहे. तर रात्री पाऊन दमदार पाऊस सुरु असल्याने ग्रामीण भागात देखील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत.

त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे मागच्या 15 दिवसांपासून जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com