Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' जारी

Maharashtra weather today : महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असून कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरीत ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून नागरिकांनी सतर्क राहावे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या पावसाने माघार घेतली असून बहुतांश भागात निरभ्र आकाश आणि उन्हाचा चटका कायम आहे. कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत हवामान विभागाने (IMD) येलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला

राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने अनेक भागांत पारा ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका तीव्र होत आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे. वाढलेल्या उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहत असून, नागरिकांचे हाल होत आहेत.

कोकणात 'येलो अलर्ट'चा इशारा

आज (ता. १३) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका वाढण्यासोबतच दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या भागात सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे.

दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच नैर्ऋत्य मोसमी वारे मॉन्सून आता जवळपास संपूर्ण देशातून माघारी परतण्याच्या मार्गावर आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून देशातून पूर्णपणे निरोप घेईल, तर दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तापमानाचा उच्चांक आणि नोंदी

सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय अमरावती (३८.२), अकोला (३८.१), सांताक्रूझ (३८), यवतमाळ (३७.७), सोलापूर (३७.६) आणि जळगाव (३७.१) यांसारख्या शहरांमध्येही कमाल तापमान ३७ अंशांपेक्षा अधिक नोंदवले गेले. दुसरीकडे, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT