Mumbai and Pune brace for torrential rain as IMD issues a 5-day heavy rainfall alert across 17 districts in Maharashtra.  Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Weather : पुन्हा जोरधार! पुढील २४ तास १७ जिल्ह्यात अति मुसळधार, IMD ने दिला इशारा

Maharashtra monsoon rainfall : पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे?

Namdeo Kumbhar

  • पुढील २४ तासांसाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा

  • १ ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान यलो आणि ऑरेंज अलर्ट लागू

  • कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार

  • NDRF आणि SDRF सतर्क, जिल्हा प्रशासनाला सूचना जारी

Maharashtra weather forecast September : मागील काही दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पण पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील चार दिवस राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील २४ तासांसाठी १७ जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. (IMD heavy rain alert for 17 districts in Maharashtra)

पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. IMD, NRSC या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. प्रशासना तर्फे NDRF आणि SDRF यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुढील चार दिवस राज्यात कुठे कुठे पाऊस पडणार पाहूयात...

१ सप्टेंबर २०२५ -

यलो अलर्ट -

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर

२ सप्टेंबर २०२५ -

यलो अलर्ट -

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, नाशिक, नाशिक घाट, नंदुरबार, धुळे, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर

ऑरेंज अलर्ट - सातारा घाट, कोल्हापूर घाट

३ सप्टेंबर २०२५ -

यलो अलर्ट -

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, नाशिक, नाशिक घाट, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर

ऑरेंज अलर्ट -

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट

४ सप्टेंबर २०२५

यलो अलर्ट -

मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, नाशिक घाट, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, छ. संभाजीनगर, जालना, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर

ऑरेंज अलर्ट -

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सकल आदिवासी समाजाचा नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

Shiny Hair: सुपर शाइनिंग केसांसाठी ट्राय करा हा घरगुती हेअर मास्क, दोन आठवड्यात दिसेल फरक

Fatty Liver: मधुमेह अन् लठ्ठपणामुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितले उपाय, एकदा वाचाच...

Cars Price Dropped: कारचं स्वप्न होणार पूर्ण; जीएसटीचे नवीन दर लागू झाल्यानंतर 'या' कंपनीच्या कार झाल्या स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती

Oxidised Jewellery Look: नवरात्रीचा लूकला करा खास; घागरा चोलीवर ट्राय करा या ट्रेण्डी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

SCROLL FOR NEXT