Flood In Beed  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: राज्यात मुसळधार...बीडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, नदी-ओढ्यांना पूर

Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झालाय. त्यामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आलाय.

Priya More

राज्यामध्ये मान्सून (Monsoon 2024) दाखल झाल्यापासून सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झालाय. त्यामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. राज्यात पावसाची काय परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत...

बीड -

बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बीड तालुक्यातील आंबेसावळी, घाटसावळी, बेलवाडी, पिंपळनेर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर आला असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर दुसरीकडे बीडच्या पिंपळनेर परिसरातून वाहणाऱ्या मनकर्णिका नदीला पूर आलाय. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान दुष्काळी बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांसह बीडकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हिंगोली -

हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हिंगोली जिल्ह्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वामन लोणकर (वय 60 वर्षे) असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हिंगोलीच्या सिगनगी खांबा गावातील ही घटना आहे. शेतात हळद लागवड करत असताना अचानक वीज कोसळल्याने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जालना -

जालन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. जालन्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पावसाला जोरदार सुरूवात झालीय. जालना शहरासह अनेक गावात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळणार आहे. त्याचसोबत उकाड्यामुळे हैराण झालेल्या जालनाकरांना दिलासा मिळाला.

यवतमाळ -

दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळच्या सुमारास यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली. यवतमाळ शहरासह आसपासच्या परिसरामध्ये अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली.

अमरावती -

अमरावती जिल्ह्यात अखेर आज मान्सून दाखल झाला. आजपासून पुढचे 3 दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मान्सून दाखल झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सलग पाऊस सुरू राहिल्यास जिल्ह्यात पेरणीला सुरुवात होणार आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.

वाशिम -

वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. वाशिम शहरासह मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने आज पुन्हा दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढणार आहे.

छत्रपती संभाजीनगर -

छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. वैजापूर तालुक्यातील शिवाराईमध्ये ही घटना घडली. शेतामध्ये काम करत असताना अचानक मुसळधार पाऊस आला. या पावसापासून आपला बचाव करण्यासाठी चारही शेतकरी प्लास्टिकची ताडपत्री डोक्यावर घेऊन बसले. तेवढ्यात वीज कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात १४ दिवसांत वीज पडून २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

SCROLL FOR NEXT