Maharashtra weather update saam tv
महाराष्ट्र

पुढील ५ दिवस 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का?

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम आहे. IMD नुसार विदर्भात २ आणि ३ सप्टेंबरला मुसळधार पावसासह मेघगर्जनेचा इशारा आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी हवामानाची शक्यता आहे. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Maharashtra weather forecast next five days : राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील ५ दिवसांसाठी पावसाचा नवा अंदाज जाहीर केला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याच्या उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाचा अंदाज आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे वातावरणात हा बदल झाला आहे. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. स्थानिक पातळीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विजा चमकत असताना झाडांखाली किंवा खुल्या मैदानात थांबणे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे.

पुढील ५ दिवसांत राज्यातील हवामान कसे राहील?

कोकणातील किनारपट्टीच्या भागात काही ठिकाणी रिमझिम ते मध्यम पावसाची हजेरी राहील. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक हवामान बदलांमुळे दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. राज्यात कमाल आणि किमान तापमानात फार मोठा बदल होणार नसून बहुतांश भागांत ऊन-सावल्यांचा खेळ आणि उकाडा कायम राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT