Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेची लाट येणार? तापमान ३७ अशांवर; आज कुठे कसं हवामान?

Maharashtra Weather Forecast: पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागांत तापमानात फारसा बदल होणार नाही. ज्यातील तापमानात सध्या जसे आहे तसेच राहिल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

Priya More

राज्यातील थंडी गायब होऊन आता तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढायला सुरूवात झाली आहे. राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील तापमान ३७ अंशावर पोहचले आहे. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाडमध्ये सर्वात निचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागांत तापमानात फारसा बदल होणार नाही. ज्यातील तापमानात सध्या जसे आहे तसेच राहिल. सध्या राज्यातील कमाल तापमान सातत्याने ३५ अंश सेल्सिअसच्या वरती जात असल्यामुळे उन्हाची चाहूल लागली आहे. पहाटे हलकी थंडी आणि दुपारी कडाक्याचे ऊन असल्यामुळे आता उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यामध्ये सकाळची थंडी आणि हलके धुके पाहायला मिळत आहेत. तर दुपारी तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांनी आता ऊन वाढत असल्यामुळे आपली काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पहाटे थोडासा गारवा जाणवत आहे आणि दुपारी उन्हाच्या झळा लागत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT