Maharashtra Politics : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल; विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपवली महत्वाची जबाबदारी

Maharashtra Political update : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. काँग्रेस पक्षाकडून विजय वडेट्टीवार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाकडून जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
maharashtra congress
congressSaam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने वडेट्टीवार यांची काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसकडून विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे आभार मानले. वडेट्टीवार म्हणाले, 'मला पुन्हा एकदा विधीमंडळ पक्षनेतेपदी काम करण्याची संधी दिली आहे. राज्यात एकीकडे बहुमत असलेला सत्ताधारी आणि अल्प संख्येत असलेले विरोधक अशी परिस्थिती आहे. पुढील पाच वर्ष जनतेसाठी राहून काम करू. लोकांचा मनात, हृदयात इतिहास प्रस्थापित करण्याचे काम करू'.

maharashtra congress
Mumbai Congress Protest: मदर डेअरीच्या जागेवरून काँग्रेस आक्रमक, अदानी समूहाविरोधात कुर्ल्यात आंदोलन; पाहा VIDEO

काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, 'हर्षवर्धन सपकाळ हे संघटनेतील व्यक्तिमत्व आहे. ते पूर्णवेळ संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सेवा भावी विचारांचं व्यक्तिमत्व आहे. तुळशीपत्र वाहून पूर्णवेळ काम करणार नेता म्हणून अध्यक्ष केले आहे. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्रमध्ये काम करू, पक्ष मजबूत करू'.

वडेट्टीवार यांनी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, 'सत्ता मिळाली की लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. यापेक्षा चांगले दिवस येईल. बावनकुळे यांना सांगतो की, दुसऱ्यांना कमी लेखू नये'.

maharashtra congress
Rashtrawadi Congress : राष्ट्रवादी कोणाची? आज होणार 'सुप्रीम' सुनावणी | Video

'पूर्व आणि पश्चिम विदर्भ पद आहे. विदर्भ काँग्रेससाठी गड राहिलेला आहे. विदर्भातील जनता पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी ताकदीने उभी राहील, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. 'काहीतरी खदखद सुरू आहे. महायुतीचा रिमोट सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. दिल्लीत जाऊन काही उपयोग नाही. हे सगळे दिल्लीच्या इशाऱ्यावर होत आहे. दिल्ली सांगेल, तेच महाराष्ट्रात होत आहे. गावपातळीवर भानगडीप्रमाणे सरकारमध्ये गडबड सुरू आहे.'.

maharashtra congress
Nashik Congress: महापालिका निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, वरिष्ठ नेत्या सोडणार पक्षाची साथ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com