Maharashtra Weather google
महाराष्ट्र

Maharashtra Weather: महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट! राज्यातील 'या' शहरांमध्ये पारा ३७ ते ४० अंशावर

Weather Report: मुंबईसह कोकणातील शहरांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून, गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्णतेचा सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Dhanshri Shintre

राज्यात सध्या पहाटे गारवा आणि दुपारी तीव्र उष्णतेचा अनुभव येत आहे. विशेषतः किनारपट्टी भागात तापमान वाढून दमट हवामानाचा त्रास जाणवू लागला आहे. मुंबईसह कोकणातील शहरे प्रचंड उष्णतेच्या कचाट्यात सापडली असून, गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

फेब्रुवारी महिन्यातच राज्यातील अनेक शहरांचे तापमान ३८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून, प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी महाराष्ट्रभर तापमानात मोठी वाढ झाली होती. मराठवाडा आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट जाणवत असून, मध्य महाराष्ट्रातही सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार, पुढील तीन दिवस राज्यातील अंतर्गत भागात तापमान आणखी २-३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून, विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील २४ तासांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा परिसरात तापमान स्थिर असले तरी, उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. आज मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस ही तीव्र उष्णतेची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील उर्वरित भागांत कोरडे आणि अत्यंत गरम हवामान पाहायला मिळत आहे.

बुधवार (२६ फेब्रुवारी) रोजी राज्यातील पुणे आणि कोल्हापूर विभागात कोरडे हवामान होते. पुण्यात शिवाजीनगर येथे ३६.२°C तर लोणावळ्यात ३७.६°C तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी कमाल तापमान २७.६°C होते. कोल्हापूर आणि सांगलीत तापमान ३२°C ते ३५°C दरम्यान राहिले. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत तीव्र उष्णता जाणवत होती. नंदुरबारच्या शाहादा येथे सर्वाधिक ३९.९°C तापमान नोंदले गेले, तर धुळे, जळगाव आणि नाशिकमध्ये ३३°C ते ३६°C तापमान राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT