Maharashtra Temperatures Updates: राज्यात पावसाने पूर्णत: विश्रांती घेतली असून आता थंडीची चाहूल लागली आहे. दरवर्षीप्रमाणे अद्याप राज्यात म्हणावी तशी थंडी सुरू झाली नाही. पण राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या थंडी आहे. पहाटे आणि रात्री वातावरणात थंडावा आणि दुपारी कडाक्याचे ऊन असते. राज्यात सध्या कमाल आणि किमान तापमानामध्ये चढ-उतार सुरूच आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि नंतर थंडी असे वातावरण आहे. थंडी पडल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणाच्या नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली आहे.
मुंबईत हवेची गुणवत्ता पातळी अत्यंत खराब झाली आहे. दिवाळीमध्ये फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे मुंबईत हवेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतल्या वरळी, भायखळा, शिवडी, अंधेरी, वांद्रे, मालाड, कांदिवली, देवनार याठिकाणी हवेमध्ये गुणवत्ता खूपच खराब झाली आहे. शहरातील अनेक ठिकाणी धुळीच्या कणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होताना दिसत आहे.
निफाड येथील गहू संशोधन केंद्र, धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली घसरला आहे. तर सांताक्रुझ येथे उच्चांकी ३६.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. कोकणात आणि विदर्भात उन्हाचा चटका जास्त लागत आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चित महाराष्ट्रात रात्री आणि पहाटे हवेमध्ये गारवा जाणवत आहे.
दिवसा कडक उन्हाचे चटके आणि रात्री हुडहुडी भरवणारी थंडी अशी स्थिती राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आहे. पुढील काही दिवस तापमान असेच राहणार आहे. तर देशातील हवामानाबद्दल सांगायचे झाले तर, केरळ, चेन्नई, कर्नाटकचा काही भाग इथे पावसाची नोंद करण्यात आली आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याचं त्यांनी सांगितलं. ७ ते १० नोव्हेंबर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.