Chakan News: चाकणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांची रक्कम जप्त

Chakan Police Seized 36 Lakh: विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे. त्यामुळे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
Chakan News: चाकणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांची रक्कम जप्त
Chakan Police Seized 36 LakhSaam Tv
Published On

चाकण -शिक्रापूर रस्त्यावर विशाल गार्डनसमोर एका कारमध्ये असलेली सुमारे ३६ लाखांची रोकड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जप्त केली. आज सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ही रक्कम महाळुंगे येथील एका व्यक्तीची असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. त्यांनी ही रक्कम कुठून आणली? आणि कोणाला द्यायची होती? याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर नेमके कारण पुढे येईल.

यासंदर्भात आयकर विभागाला माहिती देण्यात येणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे. त्यामुळे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. जवळच दुय्यम निबंधक कार्यालय आहे त्यामुळे जमिनीच्या खरेदी- विक्री व्यवहारासाठी रक्कम आणली होती का? असाही संशय व्यक्त केला जात आहे. परंतु रक्कम बाळगणाऱ्याने नेमके कारण सांगितलेले नाही. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड आणि त्यांच्या पथकाने केली.

दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील शेंद्रे येथे तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा तालुका पोलिसांची ही मोठी कारवाई होती. कारमधून हे पैसे घेऊन जात होते. साताऱ्यामध्ये पोलिसांना एका कारमधून मोठी रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारची तपासणी केली तेव्हा त्यांना कारमध्ये १ कोटी रुपये आढळून आली होती. हे पैसे नेमके कोणाचे आहेत याचा तपास सुरू आहे.

Chakan News: चाकणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांची रक्कम जप्त
Maharashtra Politics: अमरावतीत पुन्हा राणा Vs अडसूळ वाद पेटला, एकमेकांविरोधात देणार उमेदवार

सोमवारी बुलडाणा पोलिसांनी २० लाखांची रक्कम जप्त केली होती. एका दुचाकीमध्ये ही रक्कम आढळून आली होती. तातडीने पोलिसांनी ही रक्कम जप्त करत संबधित व्यक्तीला ताब्यात घेतले होते. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधी अहमदनगरमध्ये तब्बल २३ कोटींचे सोनं पोलिसांनी जप्त केले होते. सुपा टोलनाक्यावर पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने तब्ब्ल २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट तसेच चांदी जप्त केली होती. तर काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर एका कारमधून तब्बल ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती.

Chakan News: चाकणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांची रक्कम जप्त
Supreme Court On Maharashtra Government: महाराष्ट्र सरकार दुबळं आहे; द्वेषपूर्ण वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालय संतापले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com