Heavy Rainfall Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: ४८ तास धोक्याचे! ११ जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस, IMD कडून अलर्ट

IMD Alert For Maharashtra: २७ आणि २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Priya More

राज्यातील तापमानामध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप मोठे बदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी कडाक्याची थंडी तर काही ठिकाणी पाऊस अशी राज्यातील स्थिती आहे. अशामध्ये राज्यात पुढचे ४८ तास खूपच महत्वाचे आहेत. हवामान खात्याने महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला असून यलो अल्रट जारी केला आहे. २७ आणि २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खान्देश, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमधील अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसेल. हवामानातील बदलामुळे आणि पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अशामध्ये शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाचे अपडेट्स घ्यावे आणि आवश्याकतेनुसार शेतीशी संबंधित कामं करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

26 डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या पावसासह ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 27 रोजी खान्देश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या दिवशी, २८ डिसेंबर, खान्देश, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, या भागातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अपडेट्सकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार त्यांच्या शेती पद्धती समायोजित कराव्यात. हवामानातील या बदलांचे आकलन शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी आणि संभाव्य हानी कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विविध क्षेत्रांमध्ये पावसाचे वेगवेगळे प्रमाण आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी दैनंदिन अंदाजाची माहिती ठेवावी आणि आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. या बदलत्या परिस्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विभाग मार्गदर्शन आणि अपडेट्स देत राहिल असे देखील सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राजभवनाचं नाव आता ‘लोकभवन’

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Chole Bhaji Recipe: ढाबा स्टाईल चमचमीत छोले भाजी कशी बनवायची?

मतदान केंद्रावर दोन गटांत तुफान राडा! आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते भिडले|VIDEO

निकाल पुढे ढकलला, EVM मध्ये मतं सुरक्षित राहतील का? संगणक शास्त्रज्ञांनी थेट डेमो दाखवला

SCROLL FOR NEXT