Maharashtra  
महाराष्ट्र

Maharashtra Weather Alert: ऐन दिवाळीत पावसाने घातला धुमाकूळ; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Unseasonal Rain: हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे पुढील पाच दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Sakshi Sunil Jadhav

देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचे संकट महाराष्ट्रावर घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान खात्याने (IMD) राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आता भर दिवाळीत पावसाचा ईशारा देण्यात आला आहे. २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकण भागाला मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, घरं व शेतजमिनी पाण्याखाली गेल्या होत्या, जनावरांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीतून नागरिक आणि शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, पुन्हा एकदा पावसाचा इशारा मिळाल्याने चिंता वाढली आहे.

२१ ऑक्टोबर रोजी २०२५ कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

२२ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा या भागात जोरदार पाऊस पडू शकतो.

२३ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

२४ ऑक्टोबर रोजी कोकणासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२५ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर तसेच संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, धाराशिव आणि संपूर्ण विदर्भ भागासाठी हवामान विभागाने इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT