Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: मुंबईत उन्हाचा चटका वाढतोय; विदर्भात अवकाळीचं संकट कायम

Weather Update: राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढतोय. तर विदर्भात अवकाळीचं संकट कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Rohini Gudaghe

Maharashtra Weather Update Today

राज्यातील हवामानामध्ये (Maharashtra Weather) सातत्याने बदल होत आहे. कोकण आणि मुंबई या भागांमध्ये उकाडा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता पुण्यामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. राज्यात पुन्हा एकदा तापमान वाढण्यास (Weather Forecast) सुरुवात होणार आहे.  (Latest Weather Update)

राज्यात पुढील चोवीस तासांमध्ये आणखी उकाडा वाढणार आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण किनारपट्टी भागावर थेट परिणाम दिसून येणार (Maharashtra Weather Forecast) आहेत.समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

दरम्यान राज्यात बुधवारी वाशिममध्ये सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाशिममध्ये 38.6 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील 24 तासांमध्ये वाशिममध्ये तापमान (Maharashtra Weather Forecast Update) स्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता अवकाळी पावसाने थोडीशी उसंत दिली आहे. परंतु आता उकाडा वाढत आहे. परंतु पुढील दोन दिवसांत विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.नागपूर,वर्धा,

गोंदिया आणि गडचिरोली भागात अवकाळीची शक्यता वर्तविण्यात (Weather Update) येत आहे. पुढील चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.काही भागांमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तुरळक पावसाचा अंदाज

हवामान विभागाकडून पश्चिम आसाम हिमालन पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये मुसळधार पावसाची (Rainfall) शक्यता वर्तविण्यात आली आहे आहे. तर ओडिशाचा किनारपट्टी भाग, झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टी भागात (Summer Season) तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये पुढील 2 दिवसांसाठी बर्फवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT