Maharashtra Weather  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: मराठवाडा आणि विदर्भावर अवकाळीचं संकट कायम! विजांच्या कडकडाटासह बरसणार पावसाच्या सरी

Maharashtra Weather Update Today: राज्यात कुठे ऊन, तर कुठे पाऊस अशी सध्या स्थिती आहे. आज पुन्हा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Rohini Gudaghe

राज्यात कुठे ऊन, तर कुठे पाऊस अशी सध्या स्थिती आहे. आज पुन्हा मध्य महाराष्ट्र, (Maharashtra Weather Update Today) मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सध्या दुहेरी हवामान अनुभवायला मिळत आहे. एकीकडे उन्हाचा पारा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे वादळी पावसाने अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडलं आहे. मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचं दिसत (Maharashtra Weather) आहे.

भारतीय हवामान विभागाने आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट (Heat Wave Alert) दिलेला आहे. तर नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, (Weather Update) बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. वाशीम, धुळे, परभणी, सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, आणि गडचिरोली जिल्ह्यातील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक होतं.

आज पुण्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने विजांच्या गडगटासह वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून उन्हाचा चटका वाढतो (Maharashtra Weather Forecast) तर, दुपारनंतर वादळी पाऊस होतो, असं विषम हवामान राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये सध्या अनुभवायला मिळत आहे.

ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा (Weather) इशारा कायम आहे.

२३ एप्रिलपर्यंत २४ तासांमध्ये वाशीम येथे राज्यातील उच्चांकी म्हणजेच ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अनेक जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झालं (Rain Alert) आहे. त्यामुळे विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांना वादळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भावर अवकाळीचं संकट कायम आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ता जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT