Rain News in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : राज्यातील २२ जिल्ह्यांत विजांसह जोरदार पाऊस कोसळणार; IMDने दिला इशारा, वाचा आजचा वेदर रिपोर्ट

Latest monsoon update rain alert to Kokan Mumbai Pune Raigad : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी देखील पावसाचा जोर कायम असल्याचा पाहायला मिळतंय. मुंबई, पुणे आणि कोकणात आज पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : राज्यात आज २३ ऑगस्ट रोजी कोकण, मुंबई, पुणे आणि रायगडमध्ये पावसाचा कहर कायम असल्याचं पाहायला मिळतंय. आज राज्यातील काही जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह कोकणात आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.

कोकणात आज पावसाचा येलो अलर्ट

ठाणे, रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने जारी (Maharashtra weather Update) केलाय. जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशीम, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, (weather Update) नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांसह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

तुरळक पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत २४ तासांत वर्धा येथे उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या वर आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्यामध्ये देखील वाढ (rain update) झालीय. तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळताना दिसतेय. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय.

पावसाचा जोर कायम

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्ये येत्या २ दिवसांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. आज मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची देखील शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान ३१ तर किमान तापमान २२ डिग्री सेल्सिअस आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील काही दिवस जोरदार पाऊस (rain alert) पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. कोकण पुढील सात दिवस पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT