Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला. उष्णतेची लाट कायम आहे.

Rohini Gudaghe

Maharashtra Weather Update Rain Alert

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढ ( Maharashtra Weather) होत आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात एकीकडे उन्हाचा चटका असह्य होत आहे तर दुसरीकडे वादळी पावसाला पोषक हवामान झालं आहे.राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला (Weather Forecast) आहे. तर उष्णतेची लाट कायम आहे. (Latest Weather Update)

सोलापूरमध्ये हंगामातील उच्चांकी म्हणजेच ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज ७ एप्रिल रोजी विदर्भात उष्ण लाट तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला (Weather Update) आहे. उद्यापासून म्हणजेच ८ एप्रिलपासून विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि कर्नाटकात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण छत्तीसगड विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा ( Maharashtra Weather Update Rain Alert) सक्रिय आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. उन्हाच्या झळा आणि उकाड्यामध्ये वाढ होत आहे.

आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येलो अलर्ट (Heat Wave) देण्यात आला आहे. तेथे अवकाळी पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशच्या ईशान्य भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कर्नाटक, झारखंड, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानममध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. हवामान विभागानं उद्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपीट होण्याचा इशारा (Weather Forecast) दिला आहे.

बिहारमध्ये 7 ते 8 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तरया काळात ओडिशात गारपिटीसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला ( Maharashtra Weather Forecast) आहे. आज विदर्भातील अमरावती आणि यवतमाळमध्ये उष्ण लाटेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT