नवी मुंबईत आज पहाटे रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांना उकड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं दिसत आहे. पुणे, सांगली, सोलापूरच्या विविध भागांत वादळी पाऊस पडला आहे. पुण्यात देखील मुसळधार पाऊस झाल्याचं चित्र आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा आज स्थिर आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकुल परिस्थिती असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आलं (Maharashtra Weather Forecast) आहे. तर पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी गारांचा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कराड परिसरात धुक्याची चादर पसरली आहे.
महाराष्ट्रामध्ये ८ ते १० जून दरम्यान मान्सून दाखल (Rain Alert) होतो. यावर्षीही मान्सून पुढील तीन ते चार दिवसात दाखल होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, त्या आधीच राज्यातील बहुतांश भागात पूर्वमौसमी पाऊस झोडपून काढत आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात येत्या ८ आणि ९ रोजी बहुतांश भागात जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा (Weather Update) अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पाऊस झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णीमध्ये तीन तास पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. हलकर्णी ते बसर्गे रोडवरील ओढ्यावर पाणीच पाणी पाहायला मिळालं. ओढ्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद ठेवली होती.
आजही मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसासाठी (Maharashtra Monsoon Update) यलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. राज्यामध्ये उन्हाचा चटका कमी होत आहे. तर ढगाळ हवामान आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.