पुणे शहर (Pune City) आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाला (Pune Rainfall) सुरूवात झाली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरात सायंकाळपासून पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची तारंबळ उडाली. पुण्यातील वाघोली परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला नद्याचे स्वरुप आले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे ट्राफिक जाम झाले आहे. वाहनचालकांना या पाण्यातूनच मार्ग काढत प्रवास काढावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली परिसरामध्ये पुणे महानगर मार्गावर पहिल्याच पावसाने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे महानगरपालिका यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे . याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला असता ते एकमेकाकडे ढकलाढकल करत असल्याने यातून मार्ग निघत नसल्याचे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
पुण्यात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता आहे. पुणे शहरासह राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा पुणे वेध शाळेने अंदाज वर्तवला आहे. तर आज आणि उद्या शहरात संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच मुंबईसह पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुणे वेधशाळेकडून येलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, पुण्यात मंगळवारी झालेला पाऊस हा ढगफुटीच होता, अशी माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. पुण्यात काल दोन तासांत ६८.३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. काल अचानक शहराच्या वरील भागात ढग एकत्र आले आणि मुसळधार पाऊस झाला. कात्रज भागात २३ तर खडकवासला भागात १२ मिली मीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. काल झालेल्या तुफान पावसात पुणेकरांची मात्र चांगलीच तारांबळ झालेली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.