Maharashtra Weather Forecast Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: पुढील ७२ तास अवकाळीचं संकट कायम; 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

Rohini Gudaghe

सध्या जागतिक तापमान वाढ (Maharashtra Weather Forecast) जाणवत आहे. जून २०२३ ते मार्च २०२४ पर्यंतच्या दहा महिन्यांच्या सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा उच्चांक मोडलेला आहे. राज्यावर आज देखील अवकाळी पावसाचं संकट कायम (Heat Wave) आहे. आयएमडीने पुढील 72 तासांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कायम आहे. पुढील 48 तासांमध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी राज्यात पाहायला मिळणार (Maharashtra Weather) आहे. काही जिल्ह्यांमध्ये गाटपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, राज्यासह देशामध्ये अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे.

हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला (Maharashtra Weather Update) आहे. गडगडाटासह वादळी वारे, विजा आणि सोसाट्याचा वाऱ्यासह अनेक ठिकाणी हलक्या तुरळक पावसाच्या शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मार्च महिन्यातील जागतिक पृष्ठभागाचे तापमान २० व्या शतकातील सरासरी ५४.९ अंश फॅरनहाइट (१२.७ अंश सेल्सिअस) पेक्षा २.४३ अंश फॅरनहाइटने (१.३५ अंश सेल्सिअस) जास्त (Unseasonal Rain) होते. मार्च महिना विक्रमी तापमानाचा महिना ठरला आहे. तसेच जून २०२३ पासून विक्रमी उच्च जागतिक तापमानाचा सलग १० वा महिना ठरला.

युरोप आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, तसंच पूर्व-उत्तर अमेरिका, (Maharashtra Weather Forecast) पूर्व आशिया आणि पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये मार्च महिन्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. सोमवारपर्यंत उत्तर भारत आणि मध्य भारतात आयएमडीने मोठ्या प्रमाणावर पाऊस, गारा आणि गडगडाटी वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

देशात सध्या अवकाळी पावसाने थैमान मांडले ( Todays Weather) आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने पिकांना चांगलंच झोपडलं आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे घरे, शेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी अगदी मेटाकुटीला (Weather) आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT