maharashtra weather Forcast hail and thundershowers  Saam Tv News
महाराष्ट्र

Weather Updates : महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, ऐन उन्हाळ्यात गारपीटीची शक्यता

Maharashtra Weather Forcast : येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोकण किनारपट्टी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Prashant Patil

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. येणाऱ्या दोन-तीन दिवसांत राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा या ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकीकडे राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसणार असतानाच एप्रिल, मे, जूनमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त तापमान असणार असल्याची देखील माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे मध्य महाराष्ट्रात हवेत चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे वातावरणातील खालचा जो भाग आहे, तिकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे असतात. वरच्या थरात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वारे असतात. अशी परिस्थिती ढगाळ वातावरणासाठी तथा विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्यासाठी पुरक असते. अशी परिस्थिती मागच्या दोन दिवसांपासून दिसत आहे, अशी माहिती हवामान विभागाचे डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.

येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोकण किनारपट्टी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा विचार केला तर या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीटदेखील होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती ४ आणि ५ तारखेला पूर्वेकडे स्थलांतरीत होऊन विदर्भात या दिवशी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती सानप यांनी दिली.

पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपीटची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे. नंतर तो येलो अलर्ट असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT