Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra weather : ठाण्यासह २३ जिल्ह्यांसाठी अलर्ट, वादळी पावसाचा अंदाज, वाचा आज कसं असेल हवामान

Maharashtra Weather Alert: हवामान विभागानं ठाणे, मुंबईसह २३ जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा अलर्ट दिला आहे. विजांसह ५० किमी/तास वेगाने वारे आणि हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Rain News Today : राज्यात पावसानं उघडीप दिल्यानं उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली. मान्सूनचे प्रवाह कमजोर झाला असला, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होतंय. आज राज्यात विजांसह वादळी पावसाचा (Maharashtra Weather Update) अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मान्सूनने दणक्यात एन्ट्री केली. चार-पाच दिवसात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. पण त्यानंतर पावसाने ब्रेक घेतला अन् राज्यात उकाडा वाढला. मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू झाला. मान्सून मंद गतीने पुढे सरकत आहे, काही दिवसात मान्सून महाराष्ट्र व्यापेल. पण सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेय. राज्यात २३ जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४० ते ५० किमी/तास वेगाने सोसाट्याचे वारे, विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात येत्या २४ तासांत काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात कोकण आणि गोव्यासह काही भागांत ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोकणातील किनारपट्टी भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा आहे, तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात. याशिवाय, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, कारण अरबी समुद्रात आणि लगतच्या भागात ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह खवळलेले वातावरण आहे. .

आज कुठे कुठे पाऊस कोसळणार ?

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजासंह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur-Karjat : बदलापूर-कर्जतसाठी मोदींनी घेतला मोठा निर्णय, लोकल प्रवास होणार सुसाट, मुंबई-पुणेकरांसाठीही फायदा

Maharashtra Live News Update : पुण्यात दिवसा ऊबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी

Shani Gochar 2026: 2026 साली या राशींचं भाग्य उजळणार; नवी नोकरी पैसा मिळून तुम्ही होणार करोडपती

Gold Rate Prediction: सोन्यात आता ५ लाख गुंतवले तर २०३० मध्ये किती रिटर्न मिळणार? वाचा कॅल्क्युलेशन

Sangli Politics : सांगलीत प्रचारादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा, दोन गट आपापसात भिडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT