Maharashtra Rain News Latest Updates Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. आजपासून इतरही ठिकाणी पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Priya More

Summary -

  • आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.

  • कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यााने येलो अलर्ट दिला.

  • शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने मदत जाहीर केली आहे.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये आजपासून राज्यात पुन्हा पाऊस जोर धरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सर्व नागरिक आणि शेतकऱ्यांना काळीजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अन् वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक जण पूरामध्ये वाहून गेले. तर जनावरं, कोंबड्या देखील दगावल्यात.

हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात आज पाऊस बॅटिंग करणार आहे त्याची देखील माहिती दिली आहे. आजपासून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर उर्वरीत राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या महापूराचा सर्वात जास्त फटका राज्यातील ३४ जिल्ह्यांना बसला आहे. या पूरामुळे खरिपच्या १४६ लाख हेक्टरपैकी ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने १ हजार ९८४ कोटी ९० लाखांची मदत जाहीर केली आहे. सध्या नुकसानग्रस्त भागची पाहणी मंत्र्यांकडून केली जात आहे. त्याचसोबत पंचनामे देखील सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT