Voter List Scam Saam tv
महाराष्ट्र

खळबळजनक! निवडणुकीआधी महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ, एकाच पत्त्यावर तब्बल २०० जणांची नोंद

Maharashtra Voter List Scandal : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधी मतदार यादीतील घोळ समोर आला आहे. नागपूरमध्ये एकाच घरात २०० हून अधिक मतदारांची नोंद, तर संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात नागरिकांची नावे यादीतून गायब झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Maharashtra voter list errors before local body elections : महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोळ समोर आला आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यात मतदार यादीत घोळ असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. नागपूरमध्ये एकाच पत्त्यावर २०० पेक्षा जास्त नावांची नोंद आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये इच्छूकांचीच नावे मतदान यादीतून बेपत्ता आहेत. त्याशिवाय जालनामध्येही सावळा गोंधळ असल्याची माहिती मिळाली आहे. (Voter List Chaos in Maharashtra: 200 Voters Registered at One Address in Nagpur)

एकाच घरात तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार - 200 voters registered under one address in Nagpur

नागपूर जिल्ह्याचा हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ समोर आलाय. प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकाच घरात तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार असल्याची नोंद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध यादीत घोळ समोर आला. या तपासणीत वानाडोंगरी शहरातील राजीव नगर (सरोदीपुरा) प्रभाग क्रमांक ५ मध्ये एकाच घर क्रमांक १ मध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार राहात असल्याचे दाखविण्यात आले आहे.

यासोबतच एकाच आडनावाचे तब्बल २७ व्यक्ती सुद्धा एकाच घरात राहत असल्याचे यादीमुळे समोर आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून घरोघरी तपासणी मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.

मतदार यादीत कुणाची नावे? आली कुठून? Maharashtra Election Commission voter list irregularities

विशेष म्हणजे संपत बावनथडे यांच्या घरी लहान मुलांना धरून आठ सदस्य राहत आहेत. पण त्यांच्या घर क्रमांक एकचा उल्लेख 200 पेक्षा जास्त लोकांच्या नावासमोर आपल्याला पाहायला मिळतो आहे. यातही विशेष म्हणजे आजूबाजूला राहणारे लोकांची त्या यादीत समावेश नसून यादीत असलेले व्यक्तींचे नाव अनोळखी असल्याचाही दावा स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. त्यामुळे त्या व्यक्ती या भागात राहतच नसताना नेमके आले कुठून? याचा शोध घेण्याची गरज आहे. मतदार यादी तयार होत असताना आधार कार्डशी लिंक का केला जात नाही? असा प्रश्नही शरद पवार गटाचे नेते दिनेश बंग यांनी उपस्थित केलाय. यासह स्थानिक लोकांचे नाव मात्र मतदार यादी मध्ये नसल्याचाही आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय

इच्छुक उमेदवाराचेच नाव मतदार यादीतून वगळले Voter names missing from list in Sambhajinagar and Jalna

आगामी पैठण नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवाराचेच नाव नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीतून वगळण्यात आले आहे. नाव वगळणे किंवा स्थलांतरासाठी आपण कोणताही अर्ज केलेला नसतानाही नाव वगळण्यात आल्याचा आरोप तक्रारदार तथा इच्छुक उमेदवार अजय नाथप्रसाद पोरवाल यांनी केला आहे. अजय पोरवाल आणि त्यांची पत्नी प्रिया पोरवाल यांचे नावे यादीतून गायब झाल्याबाबात त्यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले. मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला आसता ज्यांची नावे गहाळ झाली असतील त्यांनी नगरपालिकेकडे संपर्क साधावा असं आवाहन मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी केले आहे.

एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या प्रभागात, जवळपास 650 तक्रारी दाखल...

जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या प्रभाग निहाय मतदार याद्यामध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. अनेक मतदारांची नावे ते राहत असलेल्या प्रभागाऐवजी इतरत्र गेल्याने मतदार त्रस्त झाले आहे. भोकरदन नगरपरिषदेचा प्रारूप मतदार यादीमध्ये ही माहिती समोर आली असून आतापर्यंत 650 पेक्षा अधिक मतदारांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहे.दरम्यान ही चूक नगरपरिषद प्रशासनाची नसून याला संबंधित बीएलओ जबाबदार आहे. ज्या नागरिकांची नावे त्यांच्या प्रभागा व्यतिरिक्त नोंदवली आहेत त्यांच्या तक्रारी बघून घटनास्थळी जाऊन पंचनामा करून कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News: भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी

Badlapur Political News : बदलापुरात महायुतीत फूट; भाजप- राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेना धक्का

Ind vs WI Test : नाद करायचा न्हाय! मोहम्मद सिराजचा मोठा कारनामा, ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड, भारतीय गोलंदाजानं करून दाखवलं

Maharashtra Live News Update: परंडातील वागेगव्हाण येथे आमदार प्रवीण दरेकरांकडून पूरग्रस्त गावाची पाहणी

अकोल्यात वंचित अन् ठाकरे सेनेला जोरदार धक्का, आरक्षण सोडतीमुळे दिग्गजांची कोंडी अन् पक्षाला फटका

SCROLL FOR NEXT