Leaders from BJP, Shiv Sena, NCP and UBT Sena announce candidates for Maharashtra Vidhan Parishad Election 2026  Saam TV Marathi
महाराष्ट्र

MLC Candidate Name : भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अन् ठाकरेसेना... विधान परिषदेच्या १० उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Vidhan Parishad Election Full Candidate List : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांची संपूर्ण यादी समोर आली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने कोणाला दिली संधी?

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan Parishad Election BJP Shiv sena NCP All Candidate List name : राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या १० जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. भाजपकडून ६, राष्ट्रवादी काँग्रेस १, शिंदेसेना २ आणि ठाकरेंची शिवसेना १, असे १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. १२ मे रोजी १० जागांसाठी मतदान पार पडणार आहे, तर त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. ठाकरेंनी अंबादास दानवेंना तिकीट दिल्यामुळे मविआत फूट पडली आहे. काँग्रेसही उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. जर काँग्रेसने उमेदवार उतरवला तर भाजप अथवा शिंदेंची शिवसेना अतिरिक्त उमेदवार उतरवू शकते. एकनाथ शिंदेंकडून तसे संकेत देण्यात आले आहेत.

विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कोणत्या नेत्यांना विधान परिषदेसाठी संधी मिळाली, त्यावर एक नजर मारूयात...

भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार कोणते?

  • प्रज्ञा सातव

  • प्रमोद जठार

  • संजय भेंडे

  • माधवी नाईक

  • विवेक कोल्हे

  • सुनिल कर्जतकर

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार

  • बच्चू कडू

  • निलम गोऱ्हे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

  • झिशान सिद्दीकी

    शिवसेना ठाकरे गट

  • अंबादास दानवे

काँग्रेस उमेदवार देणार? कुणाच्या नावाची चर्चा ?

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधान परिषदेत आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. कुणाला उमेदवारी द्यायची, त्यासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची आज बैठक झाली. त्यामध्ये बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सचिन सावंत, अतुल लोंढे, यशोमती ठाकूर , मोहन जोशी, नसीम खान या सात नावांची जोरदार चर्चा झाली. दुसरीकडे काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न करण्यात आले. पण ही चर्चा व्यर्थ केली. काँग्रेस उमेदवारी देण्यावर ठाम असल्याचे समजतेय.

विधान परिषदेच्या निवडणुकीचं वेळापत्रक

  • निवडणुकीची अधिसूचना जारी – २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)

  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)

  • उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे, २०२६ (शनिवार)

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ४ मे, २०२६ (सोमवार)

  • मतदानाचा दिनांक – १२ मे, २०२६ (मंगळवार)

  • मतदानाची वेळ – सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत

  • मतमोजणी (निकाल) – १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ०५:०० वाजता

  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक – १३ मे, २०२६ (बुधवार)

मतांचा नेमका कोटा कसा असेल?

विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजपकडे १३१ आमदार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५७ आमदार आहेत. अजित पवार गट राष्ट्रवादीचे ४० आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे ९ उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. तर विरोधकांना फक्त एकच जागा मिळू शकते. ठाकरेसेना २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १०.. अशा विरोधकांकडे ४६ आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेणार, त्यावर विधान परिषद निवडणुका बिनविरोध होणार की नाही, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: उरले फक्त काही तास! अजूनही मार्च एप्रिलचा हप्ता जमा नाही, लाडक्या बहि‍णींना ₹३००० कधी मिळणार?

Actress Casting Couch: मध्यरात्री दिग्दर्शकाने खोलीत घुसून केली अश्लील मागणी; नकार देताच अभिनेत्रीला चित्रपटातून काढून टाकले

Maharashtra Day: १ मे हाच दिवस महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Maharashtra News Live Update : अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक, मतदानाला सुरवात

AC Cleaning Tips At Home: एसी सर्व्हिसिंगचं टेन्शन मिटेल! घरीच सोप्या पद्धतीने १० मिनिटांत करा स्वच्छ

SCROLL FOR NEXT