Maharashtra Unseasonal Rain
Maharashtra Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला! भर उन्हाळ्यातच पुण्यासह या ठिकाणी गारपीटीसह पाऊस

साम टिव्ही ब्युरो

Unseasonal Rain In Maharashtra : राज्यातील अनेक जिल्ह्यात गारपीटीसह पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढलं आहे. अचानक कोसळलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, या अवकाळी पावासाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील अनेक भागात गारपीटीसह पावासाने (Rain) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिनांक 15 ते 17 मार्च दरम्यान राज्यातील अनेक भागात वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आज राज्यातील अनेक जिल्ह्यात अनेक गारपीटीसह पावसाच्या सरी कोसळलं आहे. राज्यातील पुणे (Pune), कोल्हापूर, वर्धा, सातारा, धुळे इत्यादी जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या.

राज्यातील अनेक भागात अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक भागात दुपारपासून ढगाळ वातावरण होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हरभरा आणि गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.

साताऱ्यात बागायती शेती आणि ज्वारी पिकाचं नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीतही जोरदार पाऊस पडला आहे. अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे आठवडी बाजार काही काळ विस्कळीत झाला. एक तास गारगोटी परिसरात पावसाची हजेरी लावली.

तर पुण्याच्या शिवाजीनगर, कसबा परिसरातही जोरदार पाऊस कोसळला. दरम्यान, पावसाने आणखी चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे

पुण्यात आणखी पाऊस पडणार?

पुण्यातील आळंदी, धानोरी, चिंबळी, भिवडी परिसरात रात्री मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील हिंजवडी, तळेगाव, बाणेर, औंध येथे रात्री ९ नंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नसून केवळ गडगडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.

प्रामुख्याने सध्या दक्षिण, नैऋत्य, मध्य आणि पूर्व पुणे शहराच्या काही भागात गडगडाट सुरू आहे. आता पुणे शहर, पेठ भागात पाऊस ओसरला आहे. पुणे शहराच्या पूर्व भागात रात्री काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चाकण परिसरातही पुढील अर्ध्या तासात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM हॅक करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अंबादास दानवेंना फोन; कोण आहे मारूती ढाकणे

Live Breaking News : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

Ambadas Danve News : अडीच कोटीत Evm हॅक! अंबादास दानवेंना कुणी दिली ऑफर?

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Rupali Chakankar: EVM ची केली पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT