EVM हॅक करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अंबादास दानवेंना फोन; कोण आहे मारूती ढाकणे?

Aurangabad Loksabha Election: ईव्हीएम हॅक करून लागेल तितकं मतदान करून देतो, अशी बतावणी करणारा फोन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आलाय. याप्रकरणात पोलिसांनी एका सैनिकाला पुण्यात अटक केलीय.
Aurangabad Loksabha Election
Aurangabad Loksabha Election

छत्रपतीसंभाजी नगर : ईव्हीएम हॅक करून देतो, अडीच कोटी रुपये द्या, अशी बतावणी करणारा फोन अंबादास दानवेंना आलाय. याप्रकरणी छत्रपती संभाजी नगरच्या गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून तो सैनिक दलात असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसभा मतदानप्रक्रियेचा आज तिसरा टप्पा पार पडत आहे. निवडणुका होण्यापूर्वी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं किंवा त्यात छेडछाड केली जाऊ शकते, असा दावा विरोधकांकडून केला जात होता. याचदरम्यान ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवे यांच्याकडे तब्बल अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आलीय. दानवेंना फोन करणारा व्यक्ती हा सैन्य दलात असून तो त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलय.

ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करणाऱ्याचं नाव मारूती ढाकणे आहे. दानवेंना त्याने आपली ओळख मेजर अशी करून दिली होती. नेहमी फोन करायचा तेव्हा तो स्वत: मेजर म्हणायचा. पोलिसांनी ढाकणेला एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. मारुती ढाकणे हा जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य दलामध्ये नोकरीला आहे.

याप्रकरणात अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलीय. मला काही दिवसांपासून सुट्टीवर असताना मारूती ढाकणेने फोन करून ईव्हीएम हॅक करतो, असा दावा करीत पैशाची मागणी केल्याचं दानवे म्हणाले. 'मला काही दिवसांपासून सुट्टीवर असताना मारूती ढाकणेने फोन करून ईव्हीएम हॅक करतो असा दावा करीत पैशाची मागणी केली होती. बरेचजण फोन करत असतात, पण मी हो हा करत होतो.

मात्र ५ ते ६ दिवसांपासून कॉल करत असल्यानं मी त्यांना फोन केला. त्याला विचारलं नेमकं या प्रकरण आहे. त्यावर तो म्हणाला की,मी निवडणूक मॅनेजस करतो. त्यामुळे मला वाटलं हा व्यक्ती कार्यकर्त्यांची रचना, इतर गोष्टी करत असेल. नंतर त्याने सांगितलं मी ईव्हीएम मशीन हॅक करून देतो आणि तुमच्या बाजूने निकाल लावून देतो. यानंतर त्याच्यासोबत मी चर्चा केली, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना स्वत: फोन करत याची माहिती दिली. त्यानंतर लेखी स्वरुपात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला अटक करण्यात आल्याची माहिती दानवेंनी दिलीय.

Aurangabad Loksabha Election
Solapur Election 2024: सांगोल्यात EVM जाळलं; एकजण पोलिसांच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com