Solapur Election 2024: सांगोल्यात EVM जाळलं; एकजण पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra's Sangola Lok Sabha Election Voting News: सांगोल्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रात एक मतदाराने ईव्हीएम पेटवून दिलंय. ईव्हीएम का जाळलं याची माहिती आता समोर आलीय.
Solapur's Madha Loksabha Election Constituency News: Person set fire to EVM Machine in Bagalwadi
Solapur's Madha Loksabha Election Constituency News: Person set fire to EVM Machine in BagalwadiSaam TV

(भारत नागणे)

सोलापूर: सांगोल्यातील बागलवाडी येथे एका मतदाराने ईव्हीएम पेटवून दिल्याची घटना घडलीय. मराठा आरक्षणाच्या कारणावरून ईव्हीएम पेटवल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. ईव्हीएम जाळल्याने मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांची मात्र धांदल उडाली होती.

Solapur's Madha Loksabha Election Constituency News: Person set fire to EVM Machine in Bagalwadi
Dharashiv Election: भूम तालुक्यातील मतदान केंद्रावर ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; एकाचा मृत्यू

दरम्यान जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात अधिकची माहिती घेतं असून मतदानावर कोणतेही प्रभाव झाले नसल्याचा दावा केलाय. नवीन ईव्हीएम आणून मतदान प्रक्रिया पुन्हाने सुरू करण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, बागलवाडी येथील‌ मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर येथील ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला गेला. ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव दादासाहेब तळेकर असल्याची समोर आलीय.

दादासाहेब तळेकर हे दुपारी मतदान करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला. मतदान करण्यासाठी येताना दादासाहेब तळेकर याने एका छोट्या बाटलीत पेट्रोल भरून आणलं होतं. पेट्रोलची ही छोटी बाटली त्याने आपल्या खिश्यात लपवून आणली होती. दादासाहेब चळेकर याने ईव्हीएमवर पेट्रोल टाकलं आणि मशीनला आग लावली. यामुळे ईव्हीएम पूर्णपणे खराब झाल्याने तेथे नवीन मशीन आणून फेरमतदान केले जात आहे. या गावात साधारण १३०० मते असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान बागलवाडी येथील मतदान केंद्रात दादासाहेब चळेकर नावाच्या व्यक्तीने ईव्हीएम जाळले आहे. ईव्हीएम पूर्णपणे पेटल्यामुळे त्याचे नुकसान झालं असून येथे फेरमतदान केले जाणार आहे. तळेकर याने ईव्हीएम का जाळले याचे कारण समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या कारणावरून त्याने ईव्हीएम जाळल्याचं सांगितलं जात आहे. येथे १३०० मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार होते. येथे साधारण ५० ते ६० टक्के मतदान झाले होते. मात्र हा प्रकार घडल्याने येथे फेरमतदान घेतले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com