Mumbai-Goa Highway Update Saam tv
महाराष्ट्र

Mumbai-Goa highway: चाकरमान्यांचा प्रवास सुकर होणार; वाहतूक विभागाकडून मुंबई-गोवा महामार्गावर उपाययोजना करण्यासाठी महत्वाच्या सूचना

Mumbai-Goa highway: नवी मुंबईत बैठक संपन्न झाली. या बैठकीत वाहतूक विभागाचे महाराष्ट्र अप्पर पोलीस महासंचालक रविंद्र सिंगल यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत महत्वाच्या सूचना केल्या.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे

Mumbai Goa Highway Update:

गणेशोत्सव सण येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईतील बहुतांश चाकरमान्यांची कोकणाकडे जाण्यासाठी लगभग सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना कोकणवासीयांच्या मार्गात विघ्न येऊ नयेत, यासाठी आज नवी मुंबईत बैठक संपन्न झाली. या बैठकीत वाहतूक विभागाचे महाराष्ट्र अप्पर पोलीस महासंचालक रविंद्र सिंगल यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत महत्वाच्या सूचना केल्या. (Latest Marathi News)

मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या महामार्गाचा ४२ किलोमीटरचा भाग खुला करण्याचा राष्ट्रीय प्राधिकरणाचे प्रयत्न आहेत. येत्या काही दिवसांत पनवेल ते रायगडच्या कासूपर्यंत एका बाजूची लेन खुली करण्यात येणार आहे.

मुंबई आणि गोवा महामार्गाद्वारे जोडण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. याचदरम्यान, या महामार्गावर प्रचंड खड्डे झाले आहेत. यामुळे अनेक राजकीय पक्षांनी हा प्रश्न उचलून धरला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना कोकणवासीयांच्या मार्गात अडथळा येऊ नये, यासाठी आज नवी मुंबईत प्रमुख विभागांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. वाहतूक विभागाचे महाराष्ट्र अप्पर पोलीस महासंचालक रविंद्र सिंगल यांनी ही बैठक घेऊन मुंबई-गोवा महामार्गाचा आढावा घेतला.

या बैठकीत महासंचलाकांनी मुंबई-गोवा महामार्गावर सर्व यंत्रणेने एकत्र मिळून सर्व्हे करत अडथळे दूर करणे, अपघात होणारे ब्लॅक स्पॉ शोधणे, लहान मुलांच्या मातेसाठी फिडींग सेंटर उभारणे, जड वाहनांच्या रहदारीवर ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

या बैठकीला नवी मुंबई वाहतूक उपायुक्त, रायगड पोलीस अधीक्षक, एमएसआरडीसी आणि आरटीओचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण होणार

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासूदरम्यान ३२ किलोमीटर पट्ट्याचे काम पूर्ण झालं आहे. या मार्गावरील काम वेगाने करण्यात येत आहे. गणेशोत्सवापूर्वी सदर काम करण्याचं उद्दिष्ट शासनाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT