Maratha Andolan: गिरीश महाजन बोलत असताना कार्यकर्ते आक्रमक, जरांगे पाटलांच्या एका शब्दानं सगळे शांत झाले, नेमकं काय घडलं?

Maratha Aarakshan Andolan: गिरीश महाजन बोलत असताना कार्यकर्ते आक्रमक, जरांगे पाटलांच्या एका शब्दानं सगळे शांत झाले, नेमकं काय घडलं?
Maratha Aarakshan Andolan:
Maratha Aarakshan Andolan: Saam Tv
Published On

Maratha Aarakshan Andolan:

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. यातच आज दुसऱ्यांदा राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांनी आरक्षण जाहीर करण्यासाठी सरकारला आणखी चार दिवसांची मुदत दिली आहे. यावेळी माध्यमांशी मंत्री गिरीश महाजन यांनी सावध साधला.

महाजान हे माध्यमांशी संवाद साधत असताना जमावाने एकच गोंधळ सुरु केला. जमावाचा गोंधळ सुरु होताच जरांगे पाटील यांनी स्वतः माईक हातात घेऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. जरांगे पाटलांच्या एका शब्दानं सगळे कार्यकर्ते शांत झाले.

Maratha Aarakshan Andolan:
Explainer: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचणी काय? जाणून घ्या...

यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा माफी मागितलीय. महाजान असं बोलताना कार्यकर्त्यांनी आरडाओरड करत गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र जरांगे पाटील यांनी माईक हातात घेऊन कार्यकर्त्यांना, मी तुमच्यासाठी उपोषणाला बसलो आहे. तुम्हाला आरक्षण मिळवून देणाराच, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितलं. (Latest Marathi News)

तत्पूर्वी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, ''सोमवारी उपसमितीची बैठक झाली. ही बैठक मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. पहिल्यांदा इतकी विस्तृत बैठक झाली. समितीचं काम ६०-७० टक्के झालंय. त्यांनी एक महिन्याचा अवधी मागितला. तीन महिन्यात अहवाल न आल्यामुळे मुख्यमंत्री खूप चिडले देखील. आता समितीने सांगितलंय की, आम्ही एक महिन्यात अहवाल देऊ. (Political News)

Maratha Aarakshan Andolan:
Maratha Andolan: '...तर मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार', जरांगे पाटील यांनी सरकारला दिली 4 दिवसांची मुदत

ते म्हणाले, ''लूप होल्स राहू नये, पुन्हा कुणी कोर्टात जाऊ नये, याचा देखील तोडगा निघालाय. एक महिना सांगितलाय १५-२० दिवसांत देखील काम पूर्ण होईल. आम्हाला वाटलं जरांगे पाटील आमचं ऐकतील. आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे. दुसरे कामे बाजूला ठेवून आरक्षणाच्या विषयावर बैठका घेतोय.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com