Maharashtra Tourism 
महाराष्ट्र

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

Maharashtra Tourist Place Temperature: उन्हाळ्यात शाळांना कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे बरेच जण थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंत करतात. पण यंदा महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणी देखील तापमान चांगलेच वाढले आहेत.

Priya More

राज्यामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाली आहेत. अंगाची अक्षरश:लाही होत असून घामाच्या धारा वाहत आहेत. अशामध्ये उन्हाळ्यात शाळांना कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे बरेच जण थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंत करतात. पण यंदा महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणी देखील तापमान चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी या पर्यटन ठिकाणी देखील पाठ फिरवली आहे.

महाष्ट्रात लोणावळा- खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर आणि भंडारदरा ही थंड हवेची ठिकाणं आहेत. याठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. हिवाळा, पावसाळ्याप्रमाणे उन्हाळ्यात देखील या ठिकाणांना पर्यटक पसंती देतात. पण यंदा तापमानात कमालीची वाढ झाल्यामुळे ही थंड हवेची ठिकाणं देखील तापली आहेत. माथेरान येथे सरासरी कमाल तापमानाची नोंद ही मुंबईपेक्षाही अधिक झाली आहे. तर महाबळेश्वर येथेही उन्हाचा पारा चढता पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट परतली आहे. अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा ३५ ते ४० अंशांच्या वर पोहचला आहे. महाराष्ट्रातल्या थंड हवेच्या ठिकाणी उकाडा वाढल्यामुळे पर्यटकांची गर्दी कमी पाहायला मिळत आहे. अशामध्ये राज्यात पुढील तीन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, गुजरातमधून उष्ण वारे वाहत आहेत. अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी झाले असल्याने उष्णता आणखी वाढली आहे. राज्यात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर तापमान वाढून उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

थंड हवेच्या ठिकाणांचे तापमान -

महाबळेश्वर - 35 अंश सेल्सिअस

माथेरान - 38 अंश सेल्सिअस

लोणावळा - 38 अंश सेल्सिअस

खंडाळा - 39 अंश सेल्सिअस

भंडारदरा - 38 अंश सेल्सिअस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Police : एमडी तस्कर पोलिसांच्या ताब्यात; १२ ग्रॅम ड्रग्ससह मुद्देमाल जप्त

Viral Video : भाजप नेता Live डिबेटमध्ये पायजामा न घालताच बसले, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Manoj Jarange: ४० चोर घेऊन येवल्याचा आली बाबा लय बोलतो, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर प्रहार|VIDEO

Aabeer Gulaal: पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट भारतात होणार प्रदर्शित? वाचा महत्वाची अपडेट

नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT