Mumbai News: मुंबईकरांची चिंता वाढली, पाणीकपातीची टांगती तलवार; ७ धरणांत फक्त एवढाच पाणीसाठा!

Mumbai Dam Water level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. फक्त १९ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
Mumbai Dam Water level
Mumbai Dam Water levelSaam tv

एकीकडे वाढते तापमान आणि उकाड्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही झाली आहे. अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार असण्याची शक्यता आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. फक्त १९ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत फक्त १९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईत पाणीटंचाईची भीती व्यक्त होत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, भातसा, तानसा, तुळशी आणि विहार या सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. यातील अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा हे तलावही आटले आहेत.

Mumbai Dam Water level
Mumbai Best-Bus : मुंबईत महागाईचा भडका; बेस्ट बसचा प्रवास आणखी महागणार, तिकीट दरात होणार वाढ

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - १८.५६ टक्के

- मध्य वैतरणा - ९.६६ टक्के

- मोडक सागर - २४.२७ टक्के

- तानसा - ३५.८७ टक्के

- भातसा - १८ टक्के

- विहार - ३२.६६ टक्के

- तुळशी - ३७. ६७ टक्के

Mumbai Dam Water level
Nashik-Agra Highway Accident : नाशिकमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. यामुळे पाणीकपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मुंबई महापालिका प्रशासनाकडून अद्याप पाणी कपातीचे कोणतेही संकेत दिले नाहीत. मात्र मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन केले जात आहे. पालिका प्रशासनाकडून धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन नंतर पाणीकपातीबाबतचा निर्णय घेतला जातो. आता या धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे त्यामुळे पालिका नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Dam Water level
Pune Crime : चोरट्यांनी लांबवीले ७८२ ग्रॅम दागिने; पुण्यातील प्रख्यात डॉक्टरच्या घरात चोरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com