Kokan Ratnagiri Sindhudurga Rain News Saam tv
महाराष्ट्र

Rain Alert : भर उन्हाळ्यात कोकणवासियांना पावसाने झोडपलं, इतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती? वाचा

Kokan Ratnagiri Sindhudurga Rain News : महाराष्ट्रात कोकणात अवकाळी पावसाची सुरुवात झाली असून सिंधुदुर्ग व रत्नागिरीत विजांसह पाऊस पडत आहे. तर चंद्रपुरात तापमान ४० अंशांवर पोचल्याने उष्णतेचा तडाखा वाढला आहे.

Alisha Khedekar

  • कोकणात अवकाळी पावसाची सुरुवात

  • आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता

  • चंद्रपुरात तापमान ४० अंशांवर

  • राज्यात हवामानाचा दुहेरी परिणाम

Maharashtra Weather Update News राज्यात गेले काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाडामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र आता कोकणात देखील पावसाने सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गासह रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहेत. यामुळे आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी उन्हाचा कडाका कायम आहे.

हवामान खात्याने कोकण, मराठवाडा, विदर्भ या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. या अंदाजानुसार, कोकणात पावसाने सुरुवात केली आहे. मागील काही दिवस तळकोकणात उष्मा वाढला होता. मात्र आज दुपारपासून विजेच्या कडकडाटासह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील लांजामध्ये अवकाळी पावसाचे आगमन झाले, असून काही प्रमाणात गारपीट झाली आहे.तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढताना पाहायला मिळतो आहे. दरम्यान या अवकाळी पावसाचा फटका फळांचा राजा असलेल्या कोकणातल्या आंब्याला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.

चंद्रपुरात घामाच्या धारा, तापमानाने गाठली ४० अंशांची पातळी!

राज्याची 'हॉट सिटी' म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरात मार्च महिन्याच्या प्रारंभी ३० अंशाजवळ असलेले तापमान आता ४० अंशापर्यंत पोचले आहे. सूर्याने आपले रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांत चंद्रपूरचा पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचला आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमालीची घटली असून, नागरिक अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक आता गॉगल्स आणि स्कार्फचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. शहरात ठिकठिकाणी थंड पेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढू लागली आहे. मार्च महिना संपायचा असतानाच ही परिस्थिती आहे, तर पुढील तीन महिने कसे असतील, याचा विचारच करवत नाही. त्यामुळे लोकांनीच आता आपली काळजी घेण्याची गरज असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT