Maharashtra Rain Update. Chandrapur Rain News Today, Gadchiroli Rainfall saam tv
महाराष्ट्र

Rain Update : महाराष्ट्र- तेलंगणा मार्ग बंद; चंद्रपूरात अकरा हजार हेक्टर शेतीस फटका

गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर आणि गडचिराेलीत जाेरदार पाऊस झाला.

संजय तुमराम

गडचिराेली : महाराष्ट्र- तेलंगणा दरम्यानचा महत्त्वाचा वाहतूक दुवा असणाऱ्या नवा कालेश्वरम पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या (maharashtra) बाजूकडचा पुलाचा पोचमार्ग महापुरात (flood) वाहून गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा (Sanjay Meena) यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. (Chandrapur Rain News Today)

जिल्हाधिकारी संजय मीणा म्हणाले पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पोचमार्ग वाहून गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला याबाबत तातडीने दुरुस्तीच्या सूचना करण्यात आली आहे. सिरोंचा येथील स्थानिक प्रशासनाने या पुलावरून वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. आता येथील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे. गडचिरोलीतील सद्या दक्षिण भागात गोदावरी नदीमुळे (godavari river update) पूरस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत वेळोवेळी माहिती घेऊन नागरिकांना मदत दिली जात आहे. आपत्तीविषयक मदतीसाठी ०७१३२ २२२०३०,२२२०३१ संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पावसाचा अकरा हजार हेक्टरवरील शेतीला फटका

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात खरीपाची 64 टक्के पेरणी झाली आहे. यात कापूस, सोयाबीन, भात पिकाचा समावेश आहे. सतत सुरू असलेला पाऊस (rain) कापूस आणि सोयाबीन पिकासाठी मारक ठरला आहे. जिल्ह्यातील 50 महसुली मंडळांपैकी 25 मंडळात अतिवृष्टीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 65 मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस तीनदा बरसलाय. सपाट जमीन, नदी-नाल्याकाठावरील शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. (Maharashtra Rain Update)

भातशेतीसाठी पूरक पाऊस

कृषी विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यात अकरा हजार हेक्टरमधील पिकांना पावसाचा फटका बसला आहे. भातशेतीसाठी मात्र हा पाऊस सध्या उपयुक्त ठरला आहे अशी माहिती भाऊसाहेब ब-हाटे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर) यांनी दिली. (Gadchiroli Rainfall)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्पाय कॅमेरा अन् ७४ तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ; विमानातील पायलटचं भयंकर कृत्य

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

SCROLL FOR NEXT