maharashtra state educational institution corporation statement on ssc and hsc exam Saam TV
महाराष्ट्र

SSC-HSC Exam: ...अन्यथा दहावी- बारावीची परीक्षा होणार नाही; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा

सरकार मागण्यांबाबत विचार करेल अशी आशा महामंडळास आहे.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

Nagpur News :

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या दहावी (ssc exam) व बारावीच्या परीक्षांवर (hsc exam) बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार महामंडाळाने सरकारशी केला आहे. (Maharashtra News)

इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी महिन्यात तर फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षा नियाेजीत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री आमच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढत नाही तोपर्यंत आमच्या शाळांच्या इमारती व कर्मचारी बोर्डांच्या परीक्षाकरता उपलब्ध करून देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे.

आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र व ईमेलने पाठवले आहे. मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याने महामंडळाने परीक्षांवर बहिष्काराचा इशारा टाकल्याचे सांगण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशा आहेत मागण्या

1) राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. 2012 पासून अजून पर्यंत भरती प्रक्रिया झालेली नाही. ती नेमणूक ताबडतोब करावी.

2) महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेत्तर अनुदान थकीत द्यावे (2004 ते 2013 पर्यंतचे).

3) प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध.

4) नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदी बाबत माहिती द्यावी.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT