State Cooperative Election Authority clears path for elections in 11,041 cooperative societies across Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

Election: राज्यातील ११ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Maharashtra State Cooperative Election : महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर, आता सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ११,०४१ संस्थांसाठी निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Bharat Jadhav

  • राज्यातील ११,०४१ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा.

  • उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया पुन्हा सुरू.

  • अ आणि ब वर्गातील संस्थांची निवडणूक थांबलेल्या टप्प्यापासून पुढे.

राज्यातील महापालिका, झेडपीनंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थगिती देण्यात आलेल्या सहकारी संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबल्या होत्या त्या तेथून पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या टप्प्यापासून सुरू कराव्यात, असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी दिलेत. त्यामुळे राज्यातील सुमारे ११ हजार ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. अ, ब वर्गातील संस्थांचा निवडणूक प्रक्रिया थांबलेल्या टप्प्यापासून सुरू झाली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार राज्यातील नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याबाबत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेशीत केलेल्या सहकारी संस्था वगळून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील.

प्रलंबित सहकारी संस्थेच्या निवडणुकांकरिता अर्हता दिनांक निश्चित करणे तसेच सन २०२६ मध् निवडणुकीस पात्र होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भातही आदेश देण्यात आलेत. जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे अद्याप दाखल केलेल्या नाहीत, अशा प्रलंबित सहकारी संस्था तसेच या आदेशाच्या दिनांकापूर्वी प्राधिकृत अधिकारी, प्रशासक, प्रशासक मंडळ नियुक्त आहे, अशा सहकारी संस्था आणि हंगामी समितीची मुदत संपुष्टात आली आहे,

अशा सहकारी संस्थांच्या निवडणुकीकरिता प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी दिनांक १ फेब्रुवारी २०२६ हा अर्हता दिनांक (कट ऑफ डेट) देण्यात आला. हा अर्हता दिनांक ३ महिन्यांकरिता वैध आहे. या अर्हता दिनांकापासून तीन महिन्याचा कालावधी होऊनही प्रारुप मतदार यादी प्राप्त न झाल्यास नव्याने प्रस्ताव अधिकाऱ्यांना प्राधिकरणाल सादर करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke risk: रोज 2 मिनिटांची तुमची ही सवय स्ट्रोकचा धोका करते कमी; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

'पोलिसांनी गळा दाबला, प्रायव्हेट पार्टवर मारलं'; दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची अमानुष मारहाणीची आपबिती

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या उमरग्यात थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढले

Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT